---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; गोंडगाव येथील तरुण जागेवरच ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसापासून अपघाताचे प्रमाणत वाढतच आहे. आज शनिवारी जळगावहुन भडगावकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष रमेश पाटील (वय 36, रा. गोंडगाव ता. भडगाव) असे मयताचे नाव आहे.

shirsoli acci

याबाबत असे की, गोंडगाव येथील संतोष पाटील हे अंत्यविधीसाठी जळगाव येथे आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असतात रस्त्यातच शिरसोलीजवळ त्यांच्या दुचाकी (एमएच -१९ बीए ५४२३) ला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. 

---Advertisement---

त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळताच शिरसोली येथील काही नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---