जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । मूळचा शेगाव येथील रहिवाशी असलेल्या २२ वर्षीय तरुणाने भुसावळ आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विजय संतोष थोरात (22, रा.शेगाव, जि.बुलढाणा) असे त्याचे नाव तो भुसावळ शहरातील खडका रोड भागातील 32 कॉलनी परीसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करीत होता. दरम्यान, आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत असे की, शहरातील 32 खोली भागातील पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम सुरू असून या बांधकाम साईटवर शेगाव येथील मजुर कामाला आहे. या मजुरांपैकी विजय संतोष थोरात (22, रा.शेगाव, जि.बुलढाणा) याने गळफास घेत आत्महत्या केली. रविवार, 16 रोजी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत इफ्तेखार अहमद समशेर खान (ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक निलेश चौधरी करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल