⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

वादळी पाऊसाने घेतला सावद्यातील युवकाचा बळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । दि. २० रोजी झालेल्या वादळी पावसाने सावदा शहरातील क्रांती चौकातील रहिवाशी युवकाच्या अंगावर झाडाची फांदी पडून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांना आज दि २१ रोजी पहाटे  ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. 

शहरातील क्रांती चौकातील रहिवासी असून अन्नपूर्णा मेसचे संचालक चेतन सुभाष पाटील हे आपल्या मुलांना मंदिरात आरती करण्यासाठी गेले असता त्यांना घरी आणण्यासाठी घरातून निघाले. नेटके घरा बाहेर पडले असता तेवढ्यात वादळाने भली मोठी पिंपळाची फांदी तुटून रस्त्यावर पडताच त्याच घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात  दाखल केले असता रविवार सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चेतन पाटील वय ४०  हे सुभाष पाटील यांचे पुत्र असून त्यांच्या पश्चात आई – वडील , पत्नी आणि एक चिमुकली कन्या व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आज दुपारी २ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्या घटनेतील मयत युवकांच्या परिवाराची सात्वत्व पर भेट घेतली व त्यांना धीर दिला. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मयताच्या वारसाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख मिलिंद पाटील, नगरसेवक फिरोज खान, माजी नगरसेवक शाम पाटील, सागर पाटील, मनीष भंगाळे, प्रशांत पाटील, गणेश माळी उपस्थित होते.

यावेळी  तलाठी शरद पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सर्कल पवार, फैजपूर विभागाचे प्रांत कैलास कडगल, तहसिलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होते.