जळगाव लाईव्ह न्युज | २८ सप्टेंबर २०२१ | जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण अशोक जाधव (वय-२७) असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना काल रात्री घडली आहे.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, शहरातील न्यू सम्राट कॉलनी परिसरात लक्ष्मण जाधव हा कुटुंबियासह राहतो. कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी ह्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मण जाधव आहे नैराश्य होते. सोमवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीला आले.
सायंकाळी आई शर्मिलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील राहणारा योगेश परदेसी याने मृतदेह खाली जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणी हुंबे यांनी मयत घोषीत केले. आज मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. लक्ष्मण जाधव यांच्या पश्चात पत्नी रूपाली, चार वर्षाचा मुलगा प्रणव, आई शर्मिलाबाई, राम व शुभम हे दोन भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.