Jamner : पत्नीसह सासरच्या मंडळींकडून त्रास ; तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

सप्टेंबर 11, 2025 3:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे पत्नीसह सासू, सासरे व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्म@#हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बादल हवसू मंडाळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp webp

जामनेर तालुक्यामधील कुंभारी बुद्रुक येथील बादल मंडाळे याची पत्नी रुपाली गरोदर असल्याने ती लपाली येथे माहेरी होती. यामुळे ८ सप्टेंबरला बादल याने माहेरी असलेल्या पत्नी रूपाली हिला घेऊन येतो, असे त्याच्या भाच्याला सांगून गेला होता. मात्र दुपारी तीनच्या सुमारास श्रीराम जोशी यांना बादल याने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फोनवरून समजले. त्यावरून बादलच्या नातेवाइकांनी लपाली येथे धाव घेतली.

Advertisements

दरम्यान बादल व त्याची पत्नी रूपाली तसेच सासरा संजय जयराम भवर, सासू लिलाबाई संजय भवर, शालक अक्षय संजय भवर (सर्व रा. लपाली) यांच्यात जोरदार वाद झाला होता. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून बादल याने विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Advertisements

दरम्यान सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासातून तरुणाने आत्महत्या केल्यावरून इंदूबाई चिंधू मुके (रा. कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धामणगाव बडे पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now