महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने विहीरीत उडी घेऊन संपविले जीवन ; रावेरमधील घटना

जून 29, 2023 10:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या शितल मुकेश वाघोदे (वय-१९) या तरुणीने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले असून याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

raver news jpg webp webp

नेमकी घटना काय?
वडगाव येथील शितल वाघोदे ही २८ जून रोजी कॉलेजला रावेरला जात असल्याचे सांगूल घरातून गेली होती. त्यानंतर ती घरी न असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीच काम करणाऱ्या महिलांना त्याच शेतात असलेल्या विहीरीजवळ शाळेची बॅग व चप्पल आढळली बॅग आढहून आली.

Advertisements

तिच्या बॅगेत तपासणी केली असता ती वडगावची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून विहिरीत शोध घेतला. परंतू ती मिळून आली नाही. आज गुरूवारी २९ जून रोजी सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह पाण्यात हाती आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now