शिरसोलीत तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

मार्च 24, 2021 2:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । जळगाव येथून जवळच असलेल्या शिरसोली येथील ३४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज २४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली. समाधान कडू बारी (वय-३४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून शिरसोली गावात गळफास घेवून आत्महत्या करण्याची तीन दिवसात ही तिसरी घटना आहे. 

crime

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान बारी हा पत्नी दिपाली व मुलगा दुर्गेस सह वास्तव्याला आहे. शेतीचे व मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावातचे त्याचे दुसरे घर आहे. त्याच ठिकाणी रात्री झोपायला जातात. आज सकाळी घरी येवून अंघोळ करून पुन्हा दुसऱ्या घरी गेले. बराच वेळ झाल्यानंतर घरी न आल्याने घरचे सदस्य दुसऱ्या घरी गेले असता समाधान यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी ७ वाजता उघडकीला आला.

Advertisements

मृतदेह तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई अंजनाबाई बारी, पत्नी दिपाली, सहा वर्षाचा मुलगा दुर्गेश, लहान भाऊ असा परिवार आहे. याघटनेची एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now