जळगाव लाईव्ह न्यूज । 3 फेब्रुवारी 2024 । अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. दरम्यान, जळगावातील रामभक्तांना अयोध्या जाण्यासाठी दर सोमवारी जळगाव स्थानकावरून ट्रेन मिळेल. जळगावातून आठवड्यात एक तर भुसावळ स्थानकावरून तीन रेल्वे गाड़या अयोध्येसाठी धावत आहेत.
जळगावातून रेल्वे क्रमांक २२१०२ एलटीटी-अयोध्या ही दर सोमवारी सायंकाळी ७.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोहोचते. जळगावातून रेल्वे जाण्यासाठी सुमारे १५०४ किमी अंतर प्रवास करावा लागेल. स्लीपरसाठी सुमारे ६७५ रूपये पैसे तिकिट आहे.
तसेच भुसावळातून रेल्वे क्रमांक १५१०२ छपरा एक्सप्रेस दर शुक्रवारी रात्री १२.२५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०:४८ वाजता अयोध्येला पोहोचते. सुमारे २ हजार किमीचा प्रवास करण्यासाठी हिला देखील तेवीस तास लागतील, रेल्वे क्रमांक २११२९ तुलसी एक्सप्रेस ही दर मंगळवार आणि रविवारी असेल, भुसावळातून ही दुपारी १.१० साजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता अयोध्येला पोहचेल, हा १६६३ किमीचा प्रवास असेल, स्लीपरसाठी सुमारे ५९५ रूपयांपयौत तिकिट भाडे लागेल, तर रेल्वे क्रमांक २२९८३ साकेत एक्सप्रेस ही दर बुधवार, शनिवारी भुसावळातून दुपारी १.१० वाजता निघेल.