---Advertisement---
भडगाव

मानव संरक्षण समितीच्या भडगाव तालुका महिला अध्यक्षपदी योजना पाटील

yojna patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । मानव सरंक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) समितीच्या भडगांव तालुका महिलाध्यक्षपदी योजना दत्तात्रय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

yojna patil

मानव सरंक्षण समिती नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) समितीचे अध्यक्ष विजयजी कुराडे यांचे आदेशान्वये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा राज्य हेड जनसंपर्क अधिकारी गजाननजी भगत यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याध्यक्ष शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्ष इंदुताई यादव यांनी योजना पाटील यांची सामाजिक योगदानासह विविध क्षैत्रातील निश्वार्थ जनसेवा कार्याची दख़ल घेत नियुक्ती जाहीर केली आहे.

---Advertisement---

सदर नियुक्तिनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला जनसंपर्क अधिकारी डॉ.शुभांगी रत्नपारखी,उत्तर महाराष्ट्र महिला संघटक माधुरी उदावंत तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने, सचिव महेश कौडिण्य, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, कायदेशीर सल्लागार मानसिंग सिध्दू, पाचोरा महिलाध्यक्ष मंदाकिनी पाटील, उपाध्यक्षा किरणताई पाटील, सचिव स्वातीताई पाटील यांचे सह विविध क्षैत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी योजना पाटील यांना मानव संरक्षण जनसेवा कार्यास अभिनंदनपर शुभेच्छया दिल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---