जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील नशिराबादचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यभार स्वीकारण्यापूर्वी योगेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांनुसार नशिराबादचा सर्वांगीण, सर्वसमावेशक व शाश्वत विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच युतकांसाठी विकासाच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे योगेश पाटील म्हणाले. तर नशिराबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.






