जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र योगशिक्षक संघाने जळगावमधील योगशिक्षक सुनील मधुकर गुरव यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची ‘उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख’ म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे गुरव आता जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाने समाजासाठी आणि योग शिक्षकांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. सुनील गुरव हे मागील तीन वर्षांपासून जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेत सक्रिय होते.
या काळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, राज्य कार्यकारिणी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि राज्य जनसंपर्क अधिकारी प्रा. कृणाल महाजन यांनी त्यांना पदोन्नती देत उत्तर महाराष्ट्र विभागाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध योग संस्था, योगा क्लासेस आणि योगप्रेमींनी सुनील गुरव यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.