जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरोना तिसऱ्या लाटेच्चा वेगाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावल येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या वतीने आज शहरात दवंडी फिरवण्यात आली आहे. काही दिवसापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशान्वये यावल शहरात शुक्रवारी भरणारा आठवाडी बाजारासह शहरात भरणारे दैनंदिन बाजार ही उद्या १४ जानेवारी शुक्रवारपासून पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची प्रभारी मुख्याधिकारी भविनाश गांगोडे यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
- नवीन विहीर, बोअरवेलसाठी 50000 रुपये अनुदान मिळणार ; राज्य सरकारच्या ‘या’ योजनेच्या अटी जाणून घ्या..
- रेशन कार्डधारकांनो मार्च अखेर ही काम मार्गी लावा, अन्यथा धान्य मिळणार नाही?
- जळगावात यंदाचे उच्चांकी तापमानाची नोंद ; पारा ४० चाळीशीवर
- Gold Silver Rate : दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा भाव वधारला ; खरेदीला जाण्यापूर्वी घ्या आताचे भाव
- आजचे राशिभविष्य – २७ मार्च २०२५ ; मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस?