---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Yawal : यावल शिवारात माथेफिरूने केळी घड कापून फेकले; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । एकीकडे लाखो रुपयांचा खर्च लावून शेतकरी केळी उत्पन्न पिकवीत आहे. मात्र यातच यावल तालुक्यातील शिवारात अज्ञात माथेफिरूकडून केळीचे घड कापून फेकले जात असल्याच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच आता अज्ञात माथेफिरूने कापणीवर आलेल्या केळीचे घड कापून फेकले. तब्बल ६ हजार घडांची नासधूस करत ८ लाखाचे नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात माथेफिरुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

yawal

सातत्याने अट्रावलसह यावल शेत शिवारात दीड महिन्यात ही चौथी घटना असून शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यावल येथील रहिवासी निर्मल चोपडे या शेतकऱ्याने गट क्रमांक ८११ मध्ये केळी लागवड केली आहे. ही केळी कापणी योग्य झाली परंतु अज्ञात माथेफिरूने रात्री ६ हजार केळीचे घड कापून फेकून दिले. विशेषः फळ अर्धे कापून नासधूस केली.

---Advertisement---

यात शेतकऱ्याचे तब्बल ८ लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शेतकरी निर्मल चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहे.

दरम्यान, यापूर्वी अट्रावल गावात ३० नोव्हेंबर रोजी मयुर वारके यांच्या १ हजार ८०० केळीचे खोड कापून फेकले, यात तब्बल ५ लाख ९४ हजाराचे नुकसान झाले. २२ डिसेंबर रोजी टिनेश महाजन यांची केळी कापून फेकली यात ४ लाखांचे नुकसान झाले. ५ जानेवारी रोजी केशव चौधरी यांच्या शेतातील ३ हजार घड कापून फेकत चार लाखांचे नुकसान केले. तर आता या घटनेत ६ हजार केळी घड कापून ८ लाखांचे नुकसान केले. दरम्यान पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले की घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शेत शिवारात गस्ती वाढवण्यात आली आहे आणि गुन्हेगारांच्या शोधार्थ गोपनीय पथक तयार केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---