---Advertisement---
कोरोना यावल

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोरोनाबाधीत,पत्नीलाही कोरोनाची लागण

corona
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भलेही केला जात असला तरी आता देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, यावलच्या निरीक्षकांसह त्यांच्या सौभाग्यवतींनाही कोरोनाचे लागण झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

corona

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पत्नी वर्षा मानगावकर यांना गेल्या चार दिवसांपासून ताप आल्याने स्वतःहून या दाम्पत्याने आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यात त्यांचा आरटीपीसीआर अहवाल हा कोरोनाबाधीत आल्याने दोघांवर घरीच उपचार सुरू करण्यात आले. आपल्या निवासस्थानी हे दाम्पत्य कॉरंटाईन असून प्रथम टप्प्यातील लक्षणे असल्याने तातडीने त्यांच्यावर उपचार झाले असून दोघांची प्रकृती मात्र आता ठणठणीत आहे.

---Advertisement---

कोरोना संदर्भातील लक्षणे जाणवल्यास आपण स्वतःहून तपासणी करून घ्यायला हवी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच तपासणी करीत प्रथम उपचारात आपण बरे होऊ शकतो, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---