---Advertisement---
यावल

यावल नगरपरिषदचे कनिष्ठ बांधकाम अभियंता अखेर निलंबीत

yaval
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । यावल येथील नगरपरिषदेचे कनिष्ठअभियंता एस. ए. शेख यांनी बेकायदेशीर कामे करून कामात सतत हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्यांना मुयाधिकरी बबन तडवी यांनी निलंबीत केले आहे.

yaval

येथील नगरपरिषदेचे कनिष्ठअभियंता एस. ए. शेख यांनी परिषदेच्या ठरावानुसार कामे न केल्याने, तसेच संबंधित कामांची काही कागदपत्र आढळून येत नसल्याने, कामकाजात सतत हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केला.

---Advertisement---

बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांसंबंधीचे जे देयके ठेकेदारांना प्रदान करण्यात आलेली आहे त्या संबंधित जे लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले त्याबाबतची पूर्तता न करणे कारणे दिलेल्या पत्रांचा खुलासा न करणे असे अनेक कारणावरून शेख सईद शेख अहमद यांना मुख्याधिािरी बबन तडवी यांनी अखेर निलंबीत केले आहे.

कानतोडीच्या नाल्यातील अनधिकृत संरक्षण भिंतीचे बांधकाम, वसुंधरा अभियानाचे अनियोजीत काम, तसेच जलसंवर्धनाच्या वि विध कामात त्यांनी हलगर्जीपणा करून दिलेल्या पत्राचे खुलासे न केल्याबद्यल महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १८६५चे कलम ७९ व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम१९७९ मधील तरतुदीनुसार मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबनाचे आदेश बजावले आहेत. तसेच चौकशीअंती जे नव्याने दोषारोप समोर येतील त्याबाबातही आपणास नव्याने आदेश बजवण्यात येतील असे आदेशात नमूद आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---