यावल महाविद्यालयात विविध कार्यक्रम ऑनलाईन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कौमी एकता सप्ताह विविध कार्यक्रम घेऊन ऑनलाईन साजरा करण्यात आला.
दिनांक १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या या सप्ताहात कवी संमेलन, व्याख्यान व कौमी एकतेची शपथ आदी कार्यक्रमात राबविण्यात आले. विसंमेलनात महेश अहिरे, जयश्री पाटील, कोमल बोरणारे, सुभाष कामडी यांनी कविता सादर केल्या.
उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांचे राष्ट्रीय एकात्मता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ते म्हणाले की, भारतीय समाज रचनेत विविध जाती धर्माचे लोक राहतात. या सर्वांमध्ये एकता राहिली तरच देशाची प्रगती होऊ शकेल. सर्व नागरिकांनी एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कौमी एकतेची शपथ घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम राबवण्यात आले.
यांनी केले सहकार्य
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. एस.पी. कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पी.व्ही. पावरा, प्रा.एस.आर. गायकवाड, उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, संजय पाटील,डॉ. एच. जी.भंगाळे व प्रा.आर.डी पवार यांनी सहकार्य केले.