⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | क्या बात है..! सरकारी कंपनीत 10वी पाससाठी तब्बल 3883 जागांवर भरती

क्या बात है..! सरकारी कंपनीत 10वी पाससाठी तब्बल 3883 जागांवर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीत भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. Yantra India Limited Recruitment

ही भरती अप्रेंटिस पदासाठी जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ३८८३ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. १०वी पास आणि आयटीआय पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी आयटीआय पास तरुणांसाठी २४९८ जागा रिक्त आहेत तर इतर पदांसाठी १३८५ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत NCVT किंवा SCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी. तसेच आयआयटी नसलेल्या पदांसाठी १० वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला yatra india limited recruit-gov.com या साइटवर जावे लागेल. त्यानंतर लॉग इन करा. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरुन सबमिट करा. या फॉर्मची एक प्रिंट आउट स्वतः जवळ ठेवा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पात्रतेनुसार केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट करुन गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ६००० ते ७००० रुपये वेतन दिले जाईल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक कर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.