जळगाव लाईव्ह न्यूज । यामाहा मोटर इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच करून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. यात आधुनिक रेट्रो डिझाइन असलेली XSR155, कंपनीची पहिली दोन इलेक्ट्रिक वाहने AEROX-E आणि EC-06, तसेच तरुणांसाठी डिझाइन केलेली FZ-RAVE यांचा समावेश आहे. यामाहासाठी ही लाँचिंग केवळ उत्पादनांची नव्हे, तर भारतासाठीच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे.

XSR155
XSR155 ही मोटरसायकल आधुनिक तंत्रज्ञान आणि क्लासिक डिझाइनचं सुंदर मिश्रण आहे. तिचा वक्र एलईडी हेडलाइट, टीअरड्रॉप फ्युएल टँक आणि स्टायलिश एलसीडी डिस्प्ले तिला वेगळा लूक देतात. 155 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन, १३.५ kW पॉवर आणि १४.२ Nm टॉर्क देतं. यात असिस्ट आणि स्लिपर क्लच, ड्युअल-चॅनेल ABS, आणि ट्रॅक्शन कंट्रोलसारखी आधुनिक सुरक्षा तंत्रं आहेत. ही बाईक चार आकर्षक रंगांमध्ये आणि स्क्रॅम्बलर तसेच कॅफे रेसर अॅक्सेसरी पॅकेजेससह उपलब्ध आहे. किंमत — ₹1,49,990 (एक्स-शोरूम दिल्ली).

AEROX-E – इलेक्ट्रिक मॅक्सी स्पोर्ट्स स्कूटर
AEROX-E ही यामाहाची परफॉर्मन्स-आधारित ईव्ही असून, 9.4 kW मोटर आणि 48 Nm टॉर्कसह अप्रतिम गती देते. ड्युअल 3 kWh बॅटरी, तीन रायडिंग मोड्स (इको, स्टँडर्ड, पॉवर) आणि बूस्ट फंक्शन यामुळे स्कूटरला तडजोड न करता उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळतो. एकदा चार्ज केल्यावर सुमारे 106 किमीची रेंज देते. एलईडी लाईट्स, मोठी TFT स्क्रीन, Y-कनेक्ट अॅप कनेक्टिव्हिटी आणि रिव्हर्स मोड यामुळे ही स्कूटर शहरी राइडर्ससाठी खास आहे.

EC-06 – स्मार्ट आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर
दैनंदिन प्रवास आणि फर्स्ट-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन डिझाइन केलेली EC-06 ही स्कूटर शाश्वत व स्मार्ट मोबिलिटीचं प्रतीक आहे. 6.7 kW मोटर, 4 kWh बॅटरी आणि 160 किमी रेंजसह ही स्कूटर कार्यक्षमतेचा आदर्श नमुना आहे. यात तीन रायडिंग मोड्स, रिव्हर्स मोड, फ्रंट-रियर डिस्क ब्रेक्स आणि कलर्ड एलसीडी डिस्प्ले आहे. बिल्ट-इन सिम टेलिमॅटिक्स युनिट आणि 24.5 लिटर सीटखालील स्टोरेज ही याची खास वैशिष्ट्यं आहेत.
FZ-RAVE – तरुणांसाठी स्पोर्टी पर्याय
FZ-RAVE ही 149 सीसी इंजिनसह येणारी, चपळ आणि आकर्षक मोटरसायकल आहे. एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट, सिंगल-पीस सीट, स्टायलिश टँक आणि 13 लिटर फ्युएल टँक यामुळे ही बाईक शहरी तसेच लांब प्रवासासाठी योग्य आहे. किंमत ₹1,17,218 (एक्स-शोरूम दिल्ली).



