---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनला महिला दिन उत्साहात साजरा !

---Advertisement---

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटचा उपक्रम

IMDC Police station women day

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट आयएमआर, गोदावरी नर्सिंग तर्फे एमआयडीसी औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव येथे महिला दिनाच्या पूर्व संधेला कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पो.नि संदिप पाटिल ,पो.नि माधुरी बोरसे,पो.नि अनिल वाघ उपस्थीत होते. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट तर्फे सर्व महिला पोलिस अधिकारी, इतर महिला कर्मचारी यांना फूल, चॉकलेट व भेट देऊन सन्मानित करण्यात आले.पो.नि माधुरी बोरसे यांनी आपल्या सर्व महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

---Advertisement---

महिलांचे कर्तव्यदक्ष कामगिरी त्याच बरोबर कौटुबिक जबाबदारी या गोष्टीचा ताळमेळ करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष्य देणे फार गरजेचे आहे असे सांगितले,पो.नि संदिप पाटील यांनी एका पुरुषाच्या आयुष्यात जन्मा पासून महिलांचे स्थान किती अढळ आणि महत्त्वाचे आहे ते सांगितले. आणि त्यांच्या सोबत काम करणार्‍या सर्व महिलांना अभिवादन करत त्यांच्या कामाबददल असणार्‍या एकनिष्टतेचे कौतुक केले.

काळवेळ न बघता त्या त्यांचे कर्तव्य करत आहेत हे अगदी प्रकशाने नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवयानी महाजन तसेच आभार प्रदर्शन प्रांजळ महिराळे यांनी केले. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट अध्यक्ष भुमिका नाले सचिव निधी पाटील यांनी कार्यक्रमाचा कार्यभार सांभाळला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट च्या सभासदांनी मेहनत घेतली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment