---Advertisement---
गुन्हे अमळनेर

सख्ख्या भावाच्या विधवा पत्नीवर मोठ्या दिराचा अत्याचार, पीडित महिला गरोदर; जळगाव हादरले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । राज्यासह जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाही. दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात दीर आणि भावयजीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय. मोठ्या दिराने आपल्याच लहान सख्ख्या भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडिता महिला गरोदर राहिली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकणी सासू, सासरे, दीर आणि जाऊविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधम मोठ्या दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

rape jpg webp

या संदर्भात पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी ती सासरी असतांना मोठ्या दिराने पीडितेला मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द पीडितेसोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे त्याच्यापासून पीडिता गरोदर राहिली. त्यानंतर एवढेच नाहीतर सासू, सासरे जाऊ यांनी पीडितेच्या पोटावर हाता-बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करत तिचा छळ केला.

---Advertisement---

याप्रकरणी पीडितेने धुळे शहर पोलिसात तक्रार दिली होती. शून्य क्रमांकने तो गुन्हा बुधवारी पीडितेचा मोठा दीर, जाऊ, सासू आणि सासरे या चार जणांविरोधात मारवड पोलिसांत दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत.दरम्यान, पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. तर संशयित दीर गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---