जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच भुसावळ तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यात महिलेला घरी सोडून देतो असे सांगून जंगलात नेवून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसरा फरार आहे.

याबाबत असे की, भुसावळ तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २० जुलै रोजी रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान पिडीत महिला ही ग्रामखेडी रोडने आपल्या लहान मुलाला सोबत घेवून जात होती. त्यावेळी संशयित आरोपी दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले सर्व राहणार भुसावळ यांनी महिलेला घरी सोडून देतो असे सांगून महिलेला दुचाकीवर बसवून जवळच्या जंगलात नेवून तिच्या सामूहिक बलात्कार केला.

हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले सर्व राहणार भुसावळ तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहे.





