जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२४ । जळगाव एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये इमारतीच्या बांधकाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आज मंगळवारी पहाटे घडली. प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी जबाबदार असलेल्या बांधकाम मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, प्रमिलाबाई चव्हाण ह्या मागील काही दिवसापासून एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करीत होत्या. त्या बांधकाम ठिकाणच्या तिसऱ्या मजल्यावर स्वच्छतेचे काम करीत असताना खिडकीतून खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचार सुरु असताना प्रमिलाबाई चव्हाण यांचा आज मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रमिलाबाई चव्हाण ह्या ज्याठिकाणी काम सुरू होते. त्या ठिकाणी बांधकाम ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान रा. जळगाव यांच्यासोबत वाद झाला होता. याबाबत प्रमिलाबाई यांनी पती शंकर चव्हाण यांना सांगितले होते. प्रमिलाबाई ह्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मृत्यूपुर्वी महिलेने आपले पती यांना मला कुणीतरी मागुन ढकलून दिले आहे असे सांगितले.
दरम्यान, ठेकेदार आणि माझी पत्नी यांच्या वाद झाल्याच्या कारणावरून माझ्या पत्नीला कुणीतरी ढकलून दिले आहे. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या बांधकाम मालक धिरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान यांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी प्रमिलाबाई चव्हाण यांचे पती शंकर चव्हाण यांनी केले आहे.