---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा धरणगाव

धरणगावात धमकी देत महिलेवर अत्याचार ; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२४ । मुलासह पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना धरणगाव शहरात घडली. याबाबत संशयित नराधम भुषण सुकलाल महाजन याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 15 jpg webp webp

धरणगाव शहरातील एका भागात पती व मुलासह वास्तव्यास असलेल्या २६ वर्षीय महिलेचा भूषण महाजन याने अंघोळ करतांना व्हिडीओ काढून काढला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला.

---Advertisement---

जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान त्याने ३ ते ४ वेळा महिलेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भूषण महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---