---Advertisement---
राष्ट्रीय वाणिज्य

RBIचा महत्त्वाचा निर्णय, 1 मे पासून ATM मधून पैसे काढणे महागणार ; किती लागणार शुल्क?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । आजकाल प्रत्येकजण एटीएम वापरतो, जर तुम्हीही एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण १ मे २०२५ पासून ATM मधून पैसे काढणे महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

RBI ATM

काय आहे जाणून घ्या?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम चार्चमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता १ मे २०२५ पासून एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवले आहे. बॅलन्स तपासण्याचे शुल्कही वाढले आहे. नवीन नियमांनुसार, एटीएममधून पैसे काढण्यासाठी फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट पार केल्यानंतर प्रत्येक व्यव्हारावर २३ रुपये शुल्क लागणार आहे. आता हे शुल्क २१ रुपये आहेत. त्यामुळे लिमिटपेक्षा पैसे काढण्यासाठी तुम्हाला २३ रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. १ मे २०२५पासून हे नियम लागू होणार आहे.

---Advertisement---

फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल नाही
ग्राहकांच्या फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. एटीएममधून (ATM) तुम्ही ५ वेळा फ्रीमध्ये पैसे काढू शकतात. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर शुल्क भरावे लागणार आहे. मेट्रो शहरांमध्ये ३ ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ५वेळा तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत.

ATM मधील शुल्कात वाढ का होते?
थर्ड पार्टी ATM ऑपरेटर आणि बँक गेल्या अनेक दिवसांपासून एटीएममधील शुल्कांमध्ये वाढ करण्याची मागणी करत होते. ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्याने एटीएम ऑपरेट करताना नुकसान होत आहे. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेकडे चार्ज वाढण्याची शिफारस केली होती. याला आता मंजुरी देण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment