⁠ 
रविवार, मे 19, 2024

कोण घेणार बुमराहची जागा ? भारतासमोरचा सर्वात मोठा प्रश्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू मुकणार आहेत. भारताने जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून अक्षर पटेलची निवड केली, परंतु जसप्रीतच्या जागी संघात कोण येईल हे माहित नसल्याने आता तिथे कोण येईल हे माहित नाहीये. यामुळे सगळेच उत्सुक आहेत. मोहम्मद शमी व दीपक चहर हे दोन पर्याय भारतासमोर आहेत. असे म्हटले जात आहे. मात्र याचा निर्णय ऑस्ट्रेलियातील सराव सत्रानंतरच घेतला जाईल, असे कर्णधार रोहित शर्मा यांनी जाहीर केले.


भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

भारत वि. स्थानिक क्लब, १० ऑक्टोबर
भारत वि. स्थानिक क्लब, १२ ऑक्टोबर
भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबर
भारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर

मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक

२३ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
२७ ऑक्टोबर – भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी
३० ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ
२ नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड
६ नोव्हेंबर – भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार