---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

जळगाव मनपाचा गटनेता कोण? विभागीय आयुक्तच संभ्रमात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहर मनपातील गटनेता कोण? हा तिढा अद्याप सुटलेला नसून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हेच संभ्रमात असल्याचे दिसून येते. विभागीय आयुक्तांनी पक्षाचा व्हीप न पाळल्याने भाजपच्या नगरसेवकांना बजावलेल्या नोटीसमध्ये ऍड.दिलीप पोकळे यांना गटनेता म्हटले होते तर दुसरीकडे माहिती अधिकारात अरविंद देशमुख यांनी मागविलेल्या माहितीमध्ये भगत बालाणी यांना गटनेता दर्शविलेले आहे.

bhagat balani pokale

जळगाव मनपातील राजकारणाची गडबड दिवसेंदिवस आणखीच गुंतागुंतीची होत चालली आहे. भाजप बंडखोरांच्या बळावर शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित केली असली तरी आता बंडखोर विरुद्ध बंडखोर असा वाद पाहावयास मिळत आहे. मनपातील विविध समित्यांच्या पदावरून सर्व गोंधळ सुरु आहे. नुकतेच पार पडलेली महासभा देखील गटनेता कोण या मुद्द्यावरून तहकूब करावी लागली.

---Advertisement---

प्रभाग समिती सभापती निवडणुकीत पक्षाने दिलेला व्हीप न पाळल्याप्रकरणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपच्या माजी महापौर नगरसेविका सीमा भोळे यांच्यासह २७ नगरसेवकांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये विभागीय आयुक्तांनी ऍड.दिलीप पोकळे यांना नगरसेवक सोबतच गटनेता देखील म्हटले होते. दरम्यान, माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत दि.१० रोजी गटनेता भगत बालाणी असल्याचे स्पष्ट केले होते.

जळगावकरांना सुविधा कशा देणार? रस्ते, गटारी, साफसफाई यावर चर्चा करण्यात कोणत्याही मनपा सदस्याला रस नसून आपला नगरसेवक कुणाकडे गेला? गटनेता कोण यातच त्यांना स्वारस्य आहे. गटनेतेपदाचा वाद आणखी किती दिवस सुरु राहणार हे कुणालाही नक्की सांगता येणार नाही. विभागीय आयुक्तच संभ्रमात असल्याने इतरांच्या तर तर सर्वच विचारापलीकडे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---