जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । देशभरात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अशातच उच्चशिक्षणावर लाखो रुपये खर्च करूनही नोकरी मिळेनाशी झाली आहे. अशातच तरुणांसमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे नोकरी कधी आणि कशी मिळणार? एकीकडे तरुणांची चिंता नोकरीचा शोध तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी. अनेक विद्यार्थी सरकारी आणि खाजगी नोकरीच्या शोधात अडकतात. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला बीए पदवीनंतर कोणत्या सरकारी नोकऱ्या मिळवू शकतात हे सांगणार आहोत.
नागरी सेवा
जर एखाद्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशनमध्ये बीए केले असेल तर तो नागरी सेवा परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस पदावर सरकारी नोकरी मिळवू शकतो. कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार UPSC परीक्षेला बसू शकतात. जर एखाद्याला कलेची पार्श्वभूमी असेल तर या परीक्षेतील अनेक विषय उत्तीर्ण होण्यास मदत होऊ शकते. UPSC उत्तीर्ण करणाऱ्यांना चांगला पगार तसेच राहण्यासाठी मोठा बंगला, सुरक्षा रक्षक आणि वाहतुकीची सुविधा मिळते.
संरक्षण सेवा
देशातील बहुतांश तरुणांना संरक्षण सेवेत नोकरीची इच्छा असते. बीए पदवीनंतर, विद्यार्थ्यांना एनडीए, सीडीएस, एफसीएटी सारख्या परीक्षा देण्याची संधी मिळते. हे एक सन्माननीय आणि आव्हानात्मक काम आहे. या नोकरीत प्रमोशन आणि अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
SSC
SSC देशभरातील पदवीधर तरुणांसाठी विविध प्रकारच्या सरकारी नोकऱ्या निघत राहतात. BA पास SSC च्या खालील पदांवर नोकऱ्या मिळवू शकतात.
सहाय्यक विभाग अधिकारी (केंद्रीय सचिवालय)
सहाय्यक विभाग अधिकारी (रेल्वे)
सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी
सहाय्यक (केंद्रीय दक्षता)
सहाय्यक विभाग अधिकारी (इंटेलिजन्स ब्युरो)
सहाय्यक विभाग अधिकारी (परराष्ट्र व्यवहार)
आयकर निरीक्षक
निरीक्षक (केंद्रीय उत्पादन शुल्क)
निरीक्षक (प्रतिबंधक अधिकारी)
निरीक्षक (परीक्षक)
सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी (महसूल विभाग)
निरीक्षक (अमली पदार्थ)
ऑडिटर
उपनिरीक्षक
PSU
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) हा पदवीनंतरच्या सरकारी नोकऱ्यांचा महत्त्वाचा भाग आहे. चला सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक क्षेत्राबद्दल जाणून घेऊयात
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)
बँकिंग
बँकेत काम करणे ही अनेक तरुणांची आकांक्षा असते कारण त्यात मिळणार्या सुट्ट्या आणि सुविधा बहुतेक तरुणांना आकर्षित करतात. जर आपण यात पगाराबद्दल बोललो, तर RBI असिस्टंट, IBPS किंवा SBI प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून एक व्यक्ती वर्षाला सुमारे 2.5-10 लाख रुपये कमावतो