⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जळगावच्या तापमानात मोठी घसरण, पण उकाडा कायम ; मुसळधार पाऊस कधी पडणार?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२४ । गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या पवासाचे अखेर राज्यात आगमन झाले आहे. राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामुळे आता बाकी भागात कधी मुसळधार पाऊस होईल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, जळगाव सध्या ढगाळ वातावरण असून तापमानात मोठी घसरण झाली आहे. दिवसाच्या तापमानात घसरण झाले असले तरी अंगातून घामाच्या धारा वाहतच आहे. असह्य उकाडा जाणवत असून आता जळगावकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहेत. अशातच आज ९ ते १२ जूनदरम्यान पूर्वमोसमी वळवाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्याला यापूर्वी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. यामुळे आता पावसाची प्रतीक्षा आहे.

यातच आता सोमवार ते बुधवारदरम्यान सुमारे ५२ ते ८० मिमी पाऊस होऊ शकतो. यानंतर १३ जूननंतर पावसाला अल्प विश्रांती मिळेल, असा अंदाज वेलनेस वेदरचे संचालक यांनी वर्तवला. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. ढगाळ वातावरण व आर्द्रता वाढल्याने उकाड्यात भर पडली आहे. शनिवारी तापमानात पाच अंशांची घसरण होऊन ते ३६.७ अंशांपर्यंत खाली आले आहे.