⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

WhatsApp ने आणले ‘चॅट लॉक’ फीचर ; वापर कसा कराल? जाणून घेऊया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे करोडो युजर्स असून वापरकर्त्यांसाठी WhatsApp नवनवीन फीचर्स आणत असते. अशात व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) एक नवीन फीचर आणले असून या चॅट लॉकच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट लपवू देखील शकता. या चॅट लॉकच्या फीचरची प्रोसेस कशी असेल. त्याचा वापर कसा कराल? जाणून घेऊया

WhatsApp चॅट लॉक कसे कराल?
जर तुम्हाला तुमचे चॅट लॉक करायचे असतील तर काही सोप्या टिप्स (Tips) फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या चॅटला लॉक करायचे आहे त्या नंबरवर क्लिक करा.

चॅट उघडल्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर View Contact वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल करा तुम्हाला Chat Lock चा पर्याय दिसेल. Chat Lock पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला Continue हा पर्याय दिसेल. या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट लॉकच्या मदतीने चॅट लॉक करु शकता.

WhatsApp चॅट लॉक फीचर कसे वापरावे?
फिंगरप्रिंट सेन्सरच्या मदतीने चॅट लॉक करण्यासाठी सेन्सरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर चॅट लॉक होईल. हे चॅट तुम्हाला चॅट लिस्टच्या लॉक (Lock) केलेल्या चॅट्समध्ये हे सापडेल. जेव्हा तुम्ही फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस अनलॉकचा वापर करता तेव्हा लॉक केलेले चॅट ओपन होतील.

लॉक केलेले चॅट लपवायचे कसे?
तुम्हाला लॉक केलेले चॅट लपवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला लॉक केलेले चॅट उघडावे लागेल. लॉक केलेले चॅट उघडताच वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅट लॉक सेंटिग्जचा पर्याय दिसेल. या पर्यायावर टॅप करताच तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतील. Hide Locked Chats आणि Secret Code हे पर्याय पाहायला मिळतील.

लॉक केलेले चॅट लपवण्यासाठी तुम्हाला दोन्ही पर्यायांचा वापर करावा लागेल. Hide Locked Chats हा पर्याय ऑन करा आणि नंतर Secret Code च्या पर्यायवर क्लिक करा.सिक्रेट कोडवर टॅप केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला कोड तयार करण्यास सांगेल. त्यानंतर तुम्हाला लॉक केलेले चॅट पाहाता येणार नाही.

लॉक केलेले चॅट कसे शोधाल?
लपवलेले चॅट शोधायचे असतील तर अॅप ओपन केल्यानंतर सर्च लिस्टमध्ये सिक्रेट कोड टाइप करुन सर्च करावे लागेल. त्यानंतर चॅट पुन्हा मिळतील.