---Advertisement---
वाणिज्य

Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर काय महागणार आणि काय स्वस्त होणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२३ । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच १ फेब्रुवारी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यापासून ते कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

budget 2023 4 jpg webp webp

सरकारने मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळे देशातील फोन निर्मितीला चालना मिळेल. यासोबतच इतरही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी सीमाशुल्क, सेस आणि सरचार्जमध्ये बदल जाहीर केले. परदेशातून आयात होणाऱ्या खेळण्यांवरील सीमाशुल्क १३ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. याशिवाय, सायकलही स्वस्त होणार आहेत. तसेच लिथियम आयर्न बॅटरीवरील सीमाशुल्कही घटवण्यात आले आहे. तर चला जाणून घेऊयात अर्थसंकल्पानंतर काय महागणार आणि काय स्वस्त होणार?

---Advertisement---

या गोष्टी महागणार?
सोने आणि चांदीची परदेशातून आयात केलेली भांडी
सोने आणि चांदीचे परदेशातून आयात केलेले दागिने
प्लॅटिनमचे दागिने
विदेशी किचन चिमणी
ठराविक ब्रँडसच्या सिगारेट महागणार
छत्री

या गोष्टी स्वस्त होणार?
मोबाईल फोन
टीव्हीचे सुटे भाग
इलेक्ट्रिक कार
लिथियम आयर्न बॅटरी
परदेशातून आयात होणारी खेळणी
सायकल
बायोगॅस संबंधी उपकरणे
एलईडी टीव्ही
मोबाईल कॅमेरा लेन्स

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---