---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांचे महापौरांकडून स्वागत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राज्यातील दिग्गज मंत्री हे आज जिल्ह्यात आले आहे. जळगाव विमानतळावर आगमन होताच महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचे स्वागत केले.

ncp sharad pawar jalgaon jpg webp

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्यासह ना.जयंत पाटील (Jayant Patil), ना.प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज मंत्री, नेते शुक्रवारी जळगावात होत असलेल्या महिला परिषदेसाठी जळगावात आले आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.

---Advertisement---

जळगाव विमानतळावर महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार, मंत्री ना.जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ऍड.रवींद्र भैय्या पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---