⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेचा या शहरापर्यंत विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय

भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेचा या शहरापर्यंत विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२४ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूरदरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने भुसावळकरांची सोय झाली.

क्र. ०४१५२ सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ जानेवारी ते दि. ३० मार्चपर्यंत दर शनिवारी दुपारी ५.१५ वाजता सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता पोहोचेल.

क्र. ०४१५१ सुपरफास्ट ही साप्ताहिक विशेष गाडी दि. ०५ जानेवारी ते दि. २९ मार्च पर्यंत (१३ फेऱ्या) दर शुक्रवारी दुपारी ३.२५ वाजता कानपुर सेंट्रल येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २.५५ वाजता पोहोचेल.

या गाडीला भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, भरवारी, सिराथू आणि फतेहपूर येथे थांबे असतील, या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, ८ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान आणि ७ जनरल द्वितीय श्रेणी २ लगेज कम गाईस ब्रेक व्हॅनसह २४ डबे असतील, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.