जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२५ । जळगावमधील तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले. दरम्यान यातच आज ९ ते १७ फेब्रुवारीपर्यंत जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंशापर्यंत जाऊ शकते.
मात्र याच तुलनेत किमान तापमान घसरून १३ ते १८ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वेस्टर्न रोज बदलत आहे. आता ९ ते १७ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांपर्यंत जाईल. मात्र याच तुलनेत किमान तापमान घसरून १३ ते १८ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हवामानात रोज वेगवेगळे चढ-उतार होतील. १७ फेब्रुवारीपर्यंत आकाश निरभ्र राहील. चार दिवस पहाटे थंडी व दुपारी उन्हाचा चटका बसणार अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे.
दरम्यानं, दुसरीकडे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात तापमान वाढू लागल्याचं दिसत असून ‘फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळा जाणवू लागेल.’ अशी माहिती आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार फेब्रुवारीत वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतेक भागात सामान्यपेक्षा २०% कमी पाऊस पडेल. पाऊस नसल्याने हवेतील आर्द्रता कमी होईल आणि तापमान झपाट्याने वाढू लागेल. अशा परिस्थितीत फेब्रुवारीत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये तापमान आधीच सामान्यपेक्षा जास्त आहे. फेब्रुवारीत येथील तापमान साधारणपणे ३०- ३२ अंश सेल्सियम असते. यावेळी ते ३३ ते ३७ अंशापर्यंत पोहोचले आहे
फेब्रुवारीत तापमान वाढले तर गव्हाचे दाणे लहान राहू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. हरभरा आणि मोहरीची पिकेही वेळेपूर्वी पिकतील. सफरचंद व लिचीच्या झाडांमध्ये फुलांच्या परागीकरणासाठी कमी वेळ लागेल, त्यामुळे फळे पिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम दिसून येईल.
फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत ४५-६० दिवस थंडी किंवा उष्णता जाणवत नाही. हा वसंत ऋतू असतो. गेल्या काही वर्षांपासून वसंत ऋतूचे दिवस झपाट्याने कमी होत आहेत.जानेवारी २०२५ हा इतिहासातील तिसरा सर्वात उष्ण महिना होता.जानेवारीत देशात ७०% कमी पाऊस पडला. डोंगराळ राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी ८०% ने कमी झाली. फेब्रुवारीमध्येही पावसाची शक्यता कमी आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील तीन आठवड्यांत बहुतेक भागात सरासरी तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीतच उन्हाचा चटका वाढणार? तापमानाबाबत IMD महत्वाचा अंदाज
