---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

Weather Jalgaon : आजचा दिवस जळगावासाठी कसा असेल? घराबाहेर पडण्याआधी तपासून पहा आजचं तापमान..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला असून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज जळगावला येलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

tapman jpg webp webp

सध्या ढगाळ वातावरणामुळे जळगावात तापमानाचा पारा घसरला आहे. तापमात घट झाली असली तरी उकाड्यात काही कमी झाला नाहीय. रविवारी जळगावातील तापमानात कमाल 41.06 सेल्सिअस तर किमान 27 सेल्सिअसवर होते.

---Advertisement---

गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली. यामुळे जळगावकर होरपळून निघत आहे. उकाड्याने घामाघूम झालेला जळगावकर यातून कधी सुटका मिळेल याची प्रतीक्षा करतोय. यातच हवामान खात्याकडून जळगावला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यानुसार जिल्ह्यात विजांच्या कडकटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आठवड्यात ऊन सावलीचा खेळ सुरु राहणार आहे. आज म्हणजेच 12 जून पासून ते 16 जून दरम्यान, तापमानाचा पारा 38 ते 40 अंशापर्यंत राहणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---