जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या सगळीकडे उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून यामुळे नागरिक होरपळून निघत आहे. अजून मे महिना बाकी आहे. यातच वाढत्या तापमानाचा परिणाम आता धरणातील जलसाठ्यावर दिसून येत आहे.

हतनूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.२२ टक्के कमी साठा आहे. १७ एप्रिल २०२४ रोजी धरणात ५३.५३ टक्के जिवंत पाणीसाठा होता, तो यंदा ४८.३१ टक्के एवढा आहे. यंदा मार्चपासूनच तापमान चाळिशीच्या पार गेले. यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून साठा झपाट्याने कमी होत आहे.
भुसावळ विभागात यंदा उच्चांकी तापमान आहे. विशेष म्हणजे मार्चमध्ये तापमानाने चाळिशी गाठली. यानंतर एप्रिलमध्ये ते ४५ अंशांच्या पुढे गेले. तीव्र उष्णतेमुळे धरणातील जलसाठ्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५.२२ टक्के साठा कमी आहे.