⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांसाठी आनंदवार्ता! वाघूरसह जिल्ह्यातील 7 धरणांनी शंभरी गाठली, कोणत्या धरणात किती जलसाठा?

जळगावकरांसाठी आनंदवार्ता! वाघूरसह जिल्ह्यातील 7 धरणांनी शंभरी गाठली, कोणत्या धरणात किती जलसाठा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात यंदाचा मान्सून पाऊस आतापर्यंत चांगला बरसला आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजेच यंदा जळगाव शहर वासियांची तहान भागविणारे वाघूर धारणासह जिल्ह्यातील एकूण ७ धरणांनी शंभरी गाठली आहे. तर दोन धरण शंभरच्या उंबरवठ्यावर आले. यामुळे जळगावकरांची पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला; पण जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ झालेली नव्हती. पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी यंदा जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलसाठ्यात वाढ न झाल्याने चिंता अधिकच वाढली होती.

परंतु सप्टेंबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा आज दि. 24 सप्टेंबर रोजी एकूण ९०. ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा जलसाठा ६१.७७ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.

यंदा जिल्ह्यातील मोठे व मध्यम स्वरूपातील ७ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर गिरणा आणि मोर धरण ९९ टक्क्यावर पोहोचले आहे. सध्या मोठ्या प्रकल्पामधील जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. तर गिरणा धरण ९९.९८ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी गिरणा धरणात ५५ टक्के जलसाठा होता. मात्र यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे गिरणा धरण शंभरी जवळ पोहोचले. तसेच हतनूर धरण ७७.३७ टक्के भरले आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टक्के) (२४ सप्टेंबरपर्यंत)
मोठे प्रकल्प
हतनूर – यंदा ७७.३७ टक्के – गतवर्षी ७४.९०
गिरणा – यंदा ९९.९८ टक्के – गतवर्षी – ५५.३७
वाघूर – १०० टक्के – गतवर्षी – ९३.५७

मध्यम प्रकल्प
अभोरा – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० %
मंगरूळ- यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
हिवरा – यंदा ६३.०४ टक्के – गतवर्षी २३.७९ टक्के
सुकी – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
मोर – यंदा ९९.१२ टक्के – गतवर्षी ९५.५७ टक्के
बहुळा – यंदा ६९.२८ टक्के – गतवर्षी ५०.८५ टक्के
अग्नावती – यंदा १०० टक्के – गतवर्षी ९.२८ टक्के
तोंडापूर – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
अंजनी – यंदा ६६.९२ टक्के – गतवर्षी ८२.७४ टक्के
गूळ – यंदा ७६.६३ टक्के – गतवर्षी ८०.६५ टक्के
बोरी – यंदा १०० टक्के – गतवर्षी २८.३२ टक्के
मन्याड – यंदा ७९.५० टक्के – गतवर्षी ०० टक्के
शेळगाव बॅरेज – यंदा ७०.७२ क्के – गतवर्षी ०० टक्के

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.