⁠ 
शुक्रवार, जानेवारी 3, 2025
Home | बातम्या | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२४ । बीड (Beed) जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मीक कराड (Walmik Karad) आज मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आले आहेत. या प्रकरणात वाल्मीक कराडवर खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर, बीड जिल्ह्यातून व्यापक निदर्शने झाली होती. सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हत्यार्‍यांना अटक करण्याची मागणी केली होती. वाल्मीक कराड यांना या हत्येप्रकरणात मुख्य सुत्रधार मानले जात होते, आणि त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

वाल्मीक कराडच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये तळ ठोकला होता. सत्ताधाऱ्यांवर आणि बीडच्या मंत्रीमहोदयांवर त्यांच्याकडून जोरदार टीका केली जात होती.

राजकीय आणि सामाजिक दबाव वाढल्याने वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण आले आहेत. वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. वाल्मीक कराडच्या शरणागतीनंतर, पोलिसांनी त्यांच्याविरुद्धची कारवाई सुरू केली आहे. हत्याप्रकरणातील इतर तीन फरार आरोपींना देखील अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातील पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.