---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र

अबब..! वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारीही झाले थक्क

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत असून याच दरम्यान, सध्या एक मुद्दा चांगलाच गाजत आहे. तो म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्याप्रकरण. खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (Valmik Karad) हाच या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होतोय. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय आहे. केज न्यायालयाने कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आता वाल्मिक कराडसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडला यापूर्वीच ईडीकडून नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत.

Walmik Karad

आमदार सुरेश धस यांनी अगदी सविस्तरपणे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड नेमकं कसं घडलं आणि वाल्मिक कराडकडून खंडणी कशी मागितली जाते याबद्दलची माहिती जाहीर कार्यक्रमांमध्ये दिली आहे.

---Advertisement---

वाल्मिक कराडने तब्बल 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच याच संपत्तीसंदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिक कराडला नोटीस आल्याचं देखील धस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच वाल्मिक कराडचे संपत्ती आकड्यात सांगायचं झालं तर 1500,000,00,00,000 इतकी आहे.

आमदार सुरेश धस धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी हावरटपणाचे राजकारण केलं आहे. तसेच धनंजय मुंडेंनी वाळुतून, राखेतून पैसा कमावला आहे. याशिवाय घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड गावचा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसे घ्यायचा. भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी तो घरगड्याचे काम करायचा. गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधु पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला. पंडित अण्णांचाही तो खास बनला. पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचे सूर जुळले. पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिला. राजकारणात त्याने चांगला जम बसवला. बघता बघता वाल्मिक कराडने कोट्यावधीची संपत्ती कशी जमवली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---