---Advertisement---
जळगाव शहर

अहमदाबाद-जळगाव विमानसेवेसाठी पुन्हा प्रतीक्षा, जळगाव-मुंबई सेवा सुरू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । तांत्रिक कारणामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली जळगावातील विमानसेवा पुन्हा ५० टक्के सुरू झाली आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा गेल्या आठवड्यापासून पुन्हा सुरु करण्यात आली. तर दुसरीकडे अहमदाबाद विमान सेवेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. जळगाव अहमदाबाद विमानसेवेसाठी एप्रिल महिना उजाडण्याची शक्यता आहे.

airplain jpg webp

जळगाव विमानतळावरून सेवा पुरवणारी ट्रु-जेट कंपनीच्या व्यवस्थापनात बदल झाल्याने तसेच विमानाच्या दुरुस्तीमुळे सुमारे २५ दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात आली हाेती. गेल्या आठवड्यात कंपनीतर्फे केवळ मुंबईसाठीची सेवा सुरू करण्यात आली. त्यातही सकाळएेवजी सायंकाळी विमान फेरी आहे. सकाळच्या फ्लाइटने मुंबईत जाऊन संध्याकाळी परत येणे शक्य हाेत असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत हाेता; परंतु आता वेळेत बदल झाल्याने दाेन महिन्यांपूर्वी ८५ ते ९० टक्के हाेणारे प्रवाशांचे बुकिंग घटले आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा विमानसेवा सुरू झाली आहे; पण त्याला अपेक्षित प्रतिसाद नाही. सध्या ७२ आसनी विमानाच्या सीटपैकी केवळ ३० ते ३५ सीट बुकिंग हाेत असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

---Advertisement---

अहमदाबाद-जळगाव विमान सेवेने जळगाव बाजारपेठेचे अहमदाबादशी असलेले व्यावसायिक नाते वृद्धिंगत हाेण्यास मदत मिळत हाेती. या रुटवरील सेवेला चांगला प्रतिसाद मिळत हाेता. ९० ते ९५ टक्के बुकिंग कंपनीला मिळत हाेती. मात्र, महिन्याभरापासून ही सेवा बंद अाहे. ही सेवा मार्च महिन्याच्या २२ तारखेपर्यंत सुरू हाेणे शक्य नसल्याचे कंपनीचे राष्ट्रीय विपणन प्रमुख निमिश जाेशी यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---