जळगावात शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर अज्ञातांची दगडफेक करून तोडफोड

जानेवारी 17, 2026 12:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२६ । जळगाव शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना समोर आलीय आहे. या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.

VB

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू भंगाळे यांचे वाहन निवासस्थानाबाहेर पार्किंग केली होती. रात्री अज्ञात व्यक्तींनी या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्या असून यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisements

मात्र या घटनेवरून विष्णू भंगाळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमागील व्यक्तीस वेळीस ठेचून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून राजकीय वैरातून हा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now