जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळेंची निवड..

जानेवारी 22, 2026 10:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिकेत भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटानेही गटनेता जाहीर केला आहे. गुरुवारी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यात आली. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे.

vishnu bhangale 1

नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने दमदार कामगिरी केली. या निवडणुकीत शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मुसंडी मारली आहे. या विजयामुळे जळगाव शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Advertisements

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या प्रक्रियेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला गट अधिकृतपणे नोंदवला. यात गटनेतेपदाची माळ विष्णू भंगाळे यांच्या गळ्यात पडली असून उपगटनेते प्रतिभा देशमुख तर प्रतोद (Whip) दिलीप पोकळे यांची निवड करण्यात आली.

Advertisements

दरम्यान दुसरीकडे जळगाव महापालिकेत भाजपकडून प्रकाश बालानी यांची गटनेतेपदी निवड झाली तर नितीन बरडे यांची उपगटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now