---Advertisement---
जळगाव जिल्हा

मंत्री गिरीश महाजनांच्या मतदारसंघात आंदोलन पेटलं… संतप्त जमावांकडून वाहनांची तोडफोड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मतदारसंघातील पहूर येथे आज विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाजबांधवानी विविध मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन केलंय. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड केल्यामुळे आंदोलन स्थळी तणावाचे वातावरण होते. राज्यात एकीकडे आरक्षणावरून आधीच ओबीसी आणि मराठा समाज आमनेसामने आले असताना आता विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाज सुध्दा रस्त्यावर उतरल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

pahur andolan

नेमकं प्रकरण काय?
विमुक्त जातीत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. त्यासाठी जातीचे खोटे प्रमाणपत्र दिले जात आहे. खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर आणि ते घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाईसह विविध मागण्यासाठी आंदोलन झाले. गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडलं आहे. मात्र यावेळी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

---Advertisement---

या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. या आंदोलनात तरुणांसह महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तसेच मंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीतर सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---