⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

अखेर महाराष्ट्र्राला विधानसभेचा विरोधीपक्षनेता मिळाला ; काँग्रेसने कोणावर सोपविली जबाबदारी?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या विरोधीपक्षनेता पदाचा राजीमाना दिला होता. त्यानंतर राज्यातील विधानसभेचं विरोधीपक्षनेतेपद रिकामं झालं झाल्यामुळे नवा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. आता महाराष्ट्र्राला विधानसभेचा विरोधीपक्षनेता मिळाला आहे.

काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेता जाहीर केला आहे. विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे ४ वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती.

शिंदे-फडणवीसांचं सरकार असताना विरोधी पक्षनेतेपद पहिले राष्ट्रवादीकडे होतं. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा उद्बव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ कमी आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे.