जळगाव लाईव्ह न्यूज : 18 फेब्रुवारी 2024 : अमळनेरच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाचा अधिकारी कार्यालयात दारु पित असताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो व्हिडीओ बनवणाऱ्याला तुला करायचं ते कर, असं आव्हानदेखील देताना दिसत आहे
नेमकं प्रकरण काय?
परेश उदेवाल तरुण अमळनेर अग्निशमन दलाच्या कार्यालय परिसरात जातो. तो तिथे कार्यालयात मद्याचा पेला भरणाऱ्या एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडतो. तो संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो. यावेळी अधिकारी जे करायचं ते कर, असं त्या तरुणाला उत्तर देतो. संबंधित व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. पण या व्हिडीओत तरुणाला जे दाखवायचं आहे ते स्पष्टपणे दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.हा प्रकार समोर आणल्यानंतर त्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. पण त्या मुजोर अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. म्हणून तक्रारदार परेश उदेवाल याने उपोषणाचा इशारा देखील दिलाय.