⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Video : गुलाबराव पाटलांनी शिवसैनिकांसह पाहिला ‘धर्मवीर’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । शिवसेनेचे कट्टर नेते, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला स्व.आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला धर्मवीर चित्रपट नुकतेच चित्रपटगृहात झळकला आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुंबईहून परतले असून सोमवारी सकाळीच त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत चित्रपट पाहिला.

शिवसेनेचे आधारस्तंभ स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर चित्रपट नुकतेच राज्यभरातील सिनेमागृहात झळकला आहे. शिवसेनेसह सर्वसामान्य नागरिकांकडून चित्रपटाला जोरदार प्रतिसाद लाभत आहे. दि.१३ रोजी चित्रपट प्रदर्शित होताच जळगावात महापौर जयश्री महाजन यांनी मोफत शोचे आयोजन केले होते. युवासेनेने या शोचे नियोजन केले होते. दि.१४ रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा असल्याने जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील तिकडेच होते.

सोमवारी जळगावात परतल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळीच सिनेमागृह गाठत धर्मवीर पाहण्याचा आनंद घेतला. प्रसंगी महानगराध्यक्ष शरद तायडे, सरिता माळी, शोभा चौधरी, विराज कावडीया, शिवराज पाटील, मंगला बारी, मानसिंग पाटील, अभिजीत रंधे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चित्रपटगृह परिसरात शिवसैनिकांनी स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे, शिवसेनेचा जयघोष करीत जोरदार घोषणाबाजी केली.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/786660355653670