जळगाव शहर
जळगाव शहरात ‘या’ पाच केंद्रांवर आज होणार लसीकरण
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । शहरात दोन दिवसांच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा लस उपलब्ध होत आहे. महापालिकेच्या पाच केंद्रांसह सहा शासकीय केंद्रांवर लस मिळेल. यातील पालिकेच्या चेतनदास मेहता या केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस असणार आहे.
या पाच केंद्रांवर होणार लसीकरण
सोमवारी महापालिकेच्या डी.बी. जैन, शाहू रुग्णालय, मनपा शाळा क्रमांक ४८ व का. ऊ. कोल्हे विद्यालय या चार केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थींना कोविशील्डचा दुसरा डोस मिळेल. तर चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस मिळतील. रेडक्रॉस केंद्रावरही १८ वर्षांवरील लाभार्थींना दुसरा डोस मिळणार.