⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राष्ट्रीय | अरे देवा! अमेरिकेच्या हवामान विभागाचा भारतातील मान्सूनबाबत धक्कादायक अहवाल, यंदा पावसाळा कसा असणार?

अरे देवा! अमेरिकेच्या हवामान विभागाचा भारतातील मान्सूनबाबत धक्कादायक अहवाल, यंदा पावसाळा कसा असणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२३ । भारतात यंदा हाडे गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव मिळाल्यानंतर आता कडक उन्हाळ्याच्या झळा देखील सोसाव्या लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या हवामान विभागाने भारतीयांचीं चिंता वाढवणारा एक धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात अल-निनो’मुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता देखील वाढणार आहे.

अहवालात नेमकं काय?
अमेरिकेच्या हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने हा अहवाल जारी करून भारताला पुन्हा इशारा दिला आहे. त्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये अल निनो परिस्थिती निर्माण होण्याची ५० टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. तर अल निनोची परिस्थिती भारतात प्रचलित असण्याच्या शक्यतेवर NOAA ने म्हटले आहे की, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक म्हणजे ५८ टक्के आहे. जरी एल निनोचा संबंध कमी पावसाशी असला तरी उपलब्ध आकडेवारीवरून लवकर अंदाज बांधता येणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सूनवर अल निनोच्या प्रभावाचा परिणाम एप्रिल-मे महिन्यातच समोर येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

या अहवालात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस भारतात पडेल असं सांगितलं गेलं आहे. अल निनो ची परिस्थिती ही जून ते ऑगस्ट दरम्यान राहणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. भारतीय मान्सून हा जून ते सप्टेंबर पर्यंत राहतो आणि याच काळात अलनिनो ही हवामान प्रणाली सक्रीय राहणार असल्याने यंदा पाऊस कमी राहील असा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढणार?
दरम्यान, भारतात जवळपास तीन वर्षांपासून मान्सून काळात समाधानकारक आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. या अल निनो मुळे यंदा मात्र संपूर्ण देशभरात सरासरी पेक्षा कमी पाऊस पावसाळी काळात कोसळणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची दाट शक्यता आहे.

मात्र काही भारतीय तज्ञांनी सलग दोन महिने एखादी संस्था जर असा अंदाज बांधत असेल तर यावर गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केल आहे. एकंदरीत पुढील काही महिन्यात या हवामान प्रणालीबाबत योग्य ती माहिती समोर येईल आणि तेव्हाच भारतीय मानसून यंदा कसा असेल याबाबत स्पष्टोक्ती येणार आहे.

अल निनो म्हणजे काय?
अल निनो हा हवामान प्रणालीचा एक भाग आहे. हवामानावर त्याचा खोल परिणाम होतो. एल निनो परिस्थिती साधारणपणे दर तीन ते सहा वर्षांनी उद्भवते. पूर्व आणि मध्य विषुववृत्तीय पॅसिफिकमधील असामान्यपणे उबदार महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याला एल निनो स्थिती म्हणतात. एल निनोच्या स्थितीमुळे वाऱ्याची पद्धत बदलते आणि त्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये हवामानावर परिणाम होतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.