जळगाव लाईव्ह न्युज । ९ मे २०२२ । बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या ‘आसानी’ चक्रीवादळाने गंभीर स्वरूप धारण केले असून त्याचे तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. आसनी चक्रीवादळ 25 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकत आहे, परंतु पुढील दोन दिवसांत ते हळूहळू कमकुवत होण्याची अपेक्षा आहे.
हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला आहे
वादळाबाबत माहिती देताना हवामान खात्याने (IMD) सांगितले की, ‘असानी’मुळे ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज पहाटे 5.30 वाजता चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून 550 किमी दक्षिण-दक्षिण-पूर्व आणि पुरीच्या 680 किमी दक्षिण-पूर्वेस होते, असे सांगितले आहे.
२४ तासांत वादळ या भागात पोहोचेल
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ‘असानी’ चक्रीवादळ वायव्येकडे सरकून मंगळवारपर्यंत पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासात कमकुवत होणारा अंदाज
हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की वादळ नंतर उत्तर-ईशान्येकडे वळेल आणि ओडिशा किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडे सरकू शकते. पुढील ४८ तासांत ते हळूहळू कमकुवत होऊन चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.