---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

उष्णतेतून जळगावकरांना मिळणार दिलासा ! उद्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । सध्या जळगावसह राज्यात उन्हाचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहे. यातच हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज असल्याने उष्णतेतून जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

rain

४ ते ९ मेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे जळगावकरांसाठी पुढील आठवडा हा पावसाचाच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगावकरांसाठी जरी मे महिन्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी तापमान राहणार असले, तरी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी जळगाव शहरात या हंगामातील सर्वाधिक ४४ अंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारे पश्चिम-उत्तर वाऱ्यांमुळे तापमानाची तीव्रता वाढली आहे. जळगावचे तापमान शुक्रवारी ४३.९ अंशांवर पोहोचले.

---Advertisement---

या हंगामात सरासरी ४२ ते ४३ अंश तापमान राहिले असले तरी पारा ४४ अंशापर्यंत पोहचलेला नव्हता. मात्र, गुरुवारी पारा ४४ अंशाच्या पुढे गेला. ३ मेपर्यंत जळगाव शहर व जिल्ह्यात तापमानाचा कहर राहणार आहे. उद्या ४ मेपासून तापमानात काही अंशी घट होऊ शकते.

मे महिन्याच्या मध्यातच उष्णतेची लाट..
मार्च महिन्यात यंदा पारा ४० अंशाच्या पुढे गेला नव्हता. तर एप्रिल महिन्यात केवळ १ दिवस वगळता पारा ४० अंशाच्या खाली आला नाही. दरम्यान, मे महिना हा सर्वाधिक उष्णतेचा मानला जातो. मात्र, यंदा मे महिन्यातील काही दिवस अवकाळी पावसाचे व ढगाळ वातावरणाचे राहणार आहेत. त्यात २३ ते २५ नंतर मान्सूनपूर्व पावसालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राज्यात कसे राहणार वातावरण?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 3 मे ते 10 मे दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग आणि किरकोळ पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील काही दिवस वातावरणात ढगाळपणा जाणवेल.या भागांमध्ये विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment