जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । रेल्वे (Railway) प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ (Bhusawal) विभागातून नवी अमरावती (Amaravati) ते वीर अशी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. दोन फेऱ्या होणारी ही गाडी ६ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटेल.
ती दुसऱ्या दिवशी ७.४५ वाजता वीर स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११०२ क्रमांकाची गाडी ११ फेब्रुवारीला रात्री १० वाजता वीर स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता नवी अमरावती स्थानकावर पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा?
या गाडीला बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा या स्थानकांवर थांबा आहे. गाडीला १६ सामान्य, द्वितीय श्रेणीचे २ लगेज कम गार्ड, ब्रेक व्हॅन राहतील.